अमृतसर : पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी (दि. २०) पटियाला जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली.
१९८८ च्या या खटल्यात नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. सिद्धूला आत्मसमर्पण करण्यासाठी ४ ते ६ आठवड्याचा वेळ हवा असल्याचे वृत्त आले होते. यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात जाणार होते. मात्र, तत्पूर्वीच दिल्लीच्या पटियाला न्यायालयात त्यांनी आत्मसमर्पण केले.