24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रबाप्पांच्या विसर्जनाच्या पद्धतीमुळे नवनीत राणा पुन्हा वादात

बाप्पांच्या विसर्जनाच्या पद्धतीमुळे नवनीत राणा पुन्हा वादात

एकमत ऑनलाईन

अमरावती : एकीकडे ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…..’ अशा घोषणांनी लाडक्या गणरायाला शुक्रवारी ठिकठिकाणी भावपूर्ण निरोप देण्यात आला. अशातच दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या गणेश विसर्जन पद्धतीने त्या नेटक-यांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

राज्यभरात गणरायाचे थाटात विसर्जन होत असताना नवनीत राणा यांच्या घरच्या बाप्पाचेही विसर्जन झाले. पण त्यांच्या विसर्जन पद्धतीमुळे त्या नेटक-यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नवनीत राणांनी आधी बाप्पाला डोक्यावर घेत विसर्जन तलावापर्यंत घेऊन गेल्या आणि नंतर मूर्तीला तलावात थेट अक्षरश: फेकून देत विसर्जन केले.

ज्या पाण्यात राणांनी बाप्पाचे विसर्जन केले, ते पाणी खूपच अस्वच्छ होते, गढूळ होते. नवनीत राणांचा हाच व्हीडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नेटक-यांनी राणांना तुफान ट्रोल केले आहे. तुम्ही सतत हिंदू धर्म लोकांना शिकवता मग गणपती विसर्जन कसे करतात हे तुम्हाला माहिती नाही का? असे प्रश्न लोक राणांना विचारत आहेत. राणांची गणपती विसर्जनाची पद्धत अनेकांना खटकली आहे.

कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून पोलिस ठाण्यात जाऊन थटथयाट करूनही नवनीत राणा यांना मुलीच्या जबाबानंतर तोंडघशी पडावे लागले. या सा-या प्रकरणाने नवनीत राणा देशभर चर्चेत आल्या. गेल्या काही महिन्यांपासून मग हनुमान चालिसा असो वा ‘मातोश्री’शी घेतलेला पंगा… नवनीत राणा माध्यमांमध्ये चर्चेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या