29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्रनवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

एकमत ऑनलाईन

आई राजा उदो उदोचा जयघोष, तुळजापुरात भाविकांची गर्दी
मुंबई : शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. कोरोनाच्या २ वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. साडेतीन शक्तीपीठे असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरची रेणुकामाता आणि नाशिकच्या वणीची सप्तश्रुंगी देवीचे मंदिर नवरात्रोत्सवानिमित्त सजले. तुळजापूरही भक्तांच्या गर्दीने गजबजले आहे.

यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्सवामुळे मंदिर परिसरातील दुकाने गजबजून गेली असून फूल, प्रसाद साहित्याने फुलली आहेत. आई राजा उदोऽ उदोच्या जयघोषाने तुळजापूर दाणून गेले असून तुळजापुरात रविवारी महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे आई राजा उदो उदोच्या गजरात वाजत गाजत तुळजाभवानी मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करून व घटस्थापनेसाठी पूजेचे श्रीफळ घेवून रवाना झाले. तुळजापुरात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. त्यात कर्नाटक राज्यातील व बंजारा समाजाचा भाविकांची संख्या लक्षणीय होती.

तुळजापुरात घटस्थापना
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सोमवारपासून सुरू झाला. पहाटे मंदिरात तुळजाभवानी मातेची मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर अभिषेक पूजा करून दुपारी १२.०० वाजता मंदिराच्या गाभा-यात घटस्थापना करण्यात आली. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजीतसिंह पाटील, तुळजाभवानीचे महंत, पुजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर घरोघरी घटस्थापना करण्यात आली.

आता १० दिवस आदिशक्तीचा जागर
नवरात्रोत्सव निमित्ताने पुढील १० दिवस आदिशक्तीचा जागर पाहायला मिळणार आहे. या सोहळ््यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व नियोजन करण्यात आले असून मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या