चेन्नई : अभिनेत्री नयनतारा आणि तिचा बॉयफ्रेंड विग्नेश यांचे ‘ड्रीम वेडिंग’ ०९ जून रोजी महाबलिपूरम याठिकाणी पार पडले. या सोहळ्याला दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीप्रमाणेच बॉलिवूडमधील दिग्गजांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे. या शाही सोहळ्यामध्ये अभिनेता शाहरूख खानदेखील पोहोचला आहे.
सुपरस्टार रजनिकांत यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली असून कॉलिवूडमधील कलाकारही पोहोचले आहेत. दरम्यान या सोहळ्याला अभिनेत्री सामंथा उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते आहे.
महाबलिपूरम याठिकाणी होत असलेल्या या सोहळ्यात अजूनही कलाकार येत आहेत.
सामंथा याठिकाणी येणार नसल्याची माहिती मिळते आहे. सामंथा आणि नयनतारा यांनी विग्नेश शिवनने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यामुळे नयनताराची ही सहकलाकार या सोहळ्यामध्ये खास पाहुणी म्हणून येईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे होण्याची शक्यता कमी आहे.
…म्हणून येणार नाही सामंथा
अभिनेत्री काही प्रोफेशनल कमिटमेंट्समुळे या लग्नाला येऊ शकत नाही. मीडिया रिपोर्टस्नुसार सामंथा सध्या विजय देवराकोंडा यांच्यासह त्यांचा अपकमिंग सिनेमा ‘खुशी’याचे शूटिंग काश्मीरमध्ये करत आहे. त्यामुळे अभिनेत्री या खास सोहळ्यात उपस्थित राहणार नाही. २३ डिसेंबर रोजी ‘खुशी’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता शाहरूख खान, सुपरस्टार रजनिकांत यांच्यासह दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी नयनतारा आणि विग्नेश यांच्या लग्नाला उपस्थिती दर्शवली आहे.