16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रमुंब्रा पोलिस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

मुंब्रा पोलिस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

एकमत ऑनलाईन

आव्हाडांवरील गुन्हा रद्द करण्याची मागणी;  मुंब्रा बायपासवर टायरची जाळपोळ
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंब्रा पोलिस ठाण्याबाहेरच कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाचा गुन्हा रद्द होत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशनसमोरून हटणार नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

जितेंद्र आव्हाडांवर मुंब्रा पोलिसांनी मध्यरात्री भाजप महिला पदाधिका-याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. हे वृत्त समजताच सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंब्रा पोलिस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झाली. जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच, मुंब्रा बायपासवरही आव्हाड समर्थकांकडून टायरची जाळपोळ करण्यात आली.

रिक्षाचालकांचा बंद

जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ ठाण्यातील रिक्षाचालकांनीही आज बंद पुकारला आहे. मुंब्रा पोलिस स्टेशनबाहेरील आंदोलनात अनेक रिक्षाचालकही सहभागी झाले आहेत. आव्हाडांच्या समर्थनार्थ पोलिस स्टेशनसमोरील रस्त्यावरच चक्का जाम करण्यात आला आहे. अनेक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा या रस्त्यावर उभ्या केल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका नोकरदार व शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना बसत आहे.

आंदोलनाबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाणेकरांचे प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनामुळे त्यांना थोडासा त्रास सहन करावा लागला तरी ते करतील. जितेंद्र आव्हाडांविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या