24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeशिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादीचा जन्म

शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादीचा जन्म

एकमत ऑनलाईन

नगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापू लागलंय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा सामना रंगत असताना भाजप नेते खासदार सुजय विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना संपवण्यासाठी झालेला आहे.

राजेंच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चा सुरू असताना या विषयाची सुरुवात कोणी केली, याला ठिणगी कोणी लावली आणि आज आगीत कोण जळतंय हे सर्व महाविकास आघाडीचे चित्र जनता पाहत असल्याचे खासदार सुजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांना ‘आधी शिवसेना प्रवेश मगच राज्यसभेची संधी’ या ऑफरवर शिवसेना ठाम राहिली. दुसरीकडे संभाजीराजे शिवसेनेत जाण्यास नकार देत अपक्ष उमेदवार म्हणूनच लढण्यावर ठाम राहिले. अखेर शिवसेनेने त्यांना धक्का देत आपले कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर सुजय विखेंनी राष्ट्रवादीवर टीका केलीय. खासदार सुजय विखे म्हणाले, शिवसेना हा पक्ष गेल्या ३ वर्षांत फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे.

एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीपूर्वीच त्यांना पाठिंब्याची घोषणा केली. त्यापूर्वी हा विषय चर्चेत देखील नव्हता. पाठिंब्याची घोषणा करून हा विषय चर्चेला आणला आणि तो विषय सेनेकडे वळविण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या