24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeक्रीडानीरजने मोडले स्वत:चे ऑलिम्पिक रेकॉर्ड ; जिंकले रौप्य पदक

नीरजने मोडले स्वत:चे ऑलिम्पिक रेकॉर्ड ; जिंकले रौप्य पदक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा टोकियो गेम्सनंतर प्रथमच मैदानात उतरला. फिनलंडमध्ये झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये नीरजने ८९.३० मीटर फेक करून वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत राष्ट्रीय विक्रम केला. मात्र, तो सुवर्ण पदकापासून वंचित राहिला. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

फिनलंडच्या ऑलिव्हर हेलेंडरने ८९.८३ मीटर फेक करून सुवर्ण आणि ग्रॅनडाच्या अँडरसन पिटर्सने ८४.६५ मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले. नीरज चोप्राने त्याच्या ८७.५८ मीटरच्या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा केली, जो त्याने टोकियो ऑलिम्पिक दरम्यान साधला होता.

९० मीटरचे लक्ष्य
नीरजने यावर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे ९० मीटरचे अंतर पार करण्याचे लक्ष्य आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी ९० मीटरचे लक्ष्य गाठण्याचा तो प्रयत्न करत आहे, जेणेकरून जगातील अव्वल थ्रोवर्सच्या यादीत त्याचा समावेश करता येईल. नीरजला १५ ते २४ जुलै दरम्यान अमेरिकेत होणा-या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी व्हायचे आहे. तो सध्या फिनलंडमधील कुओर्तने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रात सराव करत असून २२ जूनपर्यंत तो तेथे असेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या