22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रना दहीहंडीच्या शुभेच्छा, ना गणेशोत्सवाच्या ....

ना दहीहंडीच्या शुभेच्छा, ना गणेशोत्सवाच्या ….

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकर यांना हिंदुत्वाचा विसर पडला, अशी बोचरी टीका भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वारंवार केली जाते. आता भाजप नेते मोहित कंबोज यांनीही ठाकरेंना हिंदुत्वावरुन डिवचले आहे. उद्धव ठाकरेंनी ना दहिहंडीच्या शुभेच्छा दिल्या, ना गणेशोत्सवाच्या, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार, असे ट्वीट कंबोज यांनी केलं आहे.

अनंत चतुर्दशीच्या दुस-याच दिवशी सकाळी मोहित कंबोज यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. ‘श्री उद्धव ठाकरे जी यांनी यावर्षी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडी उत्सवाच्या. अडीच वर्षांच्या नंतर हिंदूंनी ज्या उत्साहात हे दोन्ही सण साजरे केले, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार, हर हर महादेव !’ अशा आशयाचे ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे.

कोरोनाच्या काळात सर्वच सण-उत्सवांवर निर्बंध आले होते. त्यानंतर अडीच वर्षांच्या काळाने पहिल्यांदाच दहीहंडी, गणेशोत्सव यासारखे सण निर्बंधमुक्त साजरे झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर त्यांनी सर्व निर्बंध हटवण्याची घोषणा केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या