23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रसुरक्षेबाबत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप नव्हता

सुरक्षेबाबत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप नव्हता

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यानंतर यावर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नसल्याचे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे. शंभूराज देसाई असोत किंवा मी असो हे निर्णय घेत नसल्याचे स्पष्टीकरण देखील पाटील यांनी दिले आहे.
एसआयडीचा रिपोर्ट आल्यानंतर तशी सुरक्षा दिली जाते. सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नसल्याचे सतेज पाटील म्हणाले.

मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. आधी रिपोर्ट पाहिला जातो आणि मग त्याबाबत निर्णय घेतला जातो असेही पाटील यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही. उलट एकनाथ शिंदे त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांना जास्त सुरक्षा होती असेही पाटील म्हणाले.

खासदार संजय मंडलिक जाताना भेटून गेले
जे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले त्यांना उमेदवारी कशी दिली जाणार याबाबत स्पष्टता नाही. तो शिवसेना पक्षाचा विषय आहे. त्यातील काही लोक परत देखील जाऊ शकतात असेही पाटील म्हणाले. यापुढे निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळ्या लढवणार याचा निर्णय वरिष्ठ घेतील असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे जाताना भेटून गेले. त्यांना मी जाऊ नका अशी विनंती केली होती असे पाटील म्हणाले. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात ते आमच्याबरोबर राहतील अशी आशा आहे. संजय मंडलिक यांनी घेतलेला निर्णय दु:ख देणारा आहे. सहकारात एका प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही एकत्र येऊन लढलो. ४० आमदार आणि १२ खासदारांना नेमके काय मिळणार हा प्रश्नच असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या