32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनेपाळची संसद विसर्जित; राष्ट्रपतींनी संसद केली बरखास्त

नेपाळची संसद विसर्जित; राष्ट्रपतींनी संसद केली बरखास्त

एकमत ऑनलाईन

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या मंत्रिमंडळाने संसद बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी ती मान्य केली आहे. राष्ट्रपतींनी देशात मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे. आता नेपाळमध्ये ३ ते १० एप्रिलमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडेल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ओली सरकारने राजधानी काठमांडूमधील सुरक्षा वाढवली आहे.

नेपाळची संसद विसर्जित करा, अशी शिफारस पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली(केपी शर्मा ओली) यांनी केली होती. पंतप्रधान ओली यांच्या अध्यक्षतेखाली नेपाळच्या केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसद विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय झाला. ही शिफारस राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना पाठवण्यात आली होती. त्यांनी मंजुरी दिल्याने नेपाळमध्ये मध्यावधी निवडणूक होणार आहेत़ नेपाळची संसद विसर्जित झाल्याने देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ओलीच काम पाहणार आहेत.

संविधान परिषद अधिनियम या संदर्भात ओली सरकारने एक अध्यादेश काढला. हा अध्यादेश मागे घेण्यासाठी ओली सरकारवर विरोधकांचा प्रचंड दबाव होता. अखेर पंतप्रधान ओली यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाची रविवारी सकाळी दहा वाजता तातडीची बैठक बोलावली होती.

संविधानात तरतूद नसताना प्रस्ताव
नेपाळच्या संविधानात तरतूद नसताना संसद विसर्जित केल्यानंतर विरोधकांकडून या शिफारशीला कायदेशीर आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याआधीच संसद विसर्जित झाल्याने काय होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटात ९ ठार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या