27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडानवोदित गुजरात व लखनौ अव्वल चारात निश्चिती

नवोदित गुजरात व लखनौ अव्वल चारात निश्चिती

एकमत ऑनलाईन

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मधील ४३वा सामना शनिवारी गुजरात विरुद्ध बंगळूरू संघात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात संघाने ६ विकेट्सने सामना खिशात घातला. गुजरातचा हंगामातील हा आठवा विजय होता. या विजयाचे शिल्पकार डेविड मिलर आणि राहुल तेवतिया ठरले. तेवतियाला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय गुजरातच्या खेळाडूंनी चुकीचा सिद्ध केला.

यावेळी बंगळूरू फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७० धावा चोपल्या १७१ धावांचे आव्हान गुजरातने ४ गडी गमावत १९.३ षटकात पूर्ण केले. गुजरातकडून फलंदाजी करताना मिलरने २४ चेंडूत ३९ धावा केल्या, तर तेवतियाने २५ चेंडूत ४३ धावा चोपल्या. विशेष म्हणजे, राहुल तेवतियाने नेहमीप्रमाणे चौकार मारत सामन्याचा शेवट केलापहिल्या आठ सामन्यात पराभवाचे पाणी चाखल्यानंतर मुंबईची विजयी सलामी झाली

शनिवारी आयपीएलच्या ४४ वा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर राजस्थान विरुद्ध मुंबई संघात पार पडलेल्या सामन्यात मुंबईने ५ विकेट्स व चार चेंडू राखून विजय मिळवला. मुंबईसाठी विजयी षटकार डॅनियल सॅम्सने मारला. या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावल्यामुळे सूर्यकुमारला यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात मुंबई ने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला यावेळी प्रथम फलंदाजी करताना फलंदाजीला आलेल्या राजस्थानने निर्धारित २० षटकात ६ बाद १५८ धावा जमवल्या.

राजस्थानच्या १५९ धावांचे आव्हान मुंबईने १९.२ षटकात ५ गडी गमावत पूर्ण केले. यासोबतच हंगामातील पहिला विजय आपल्या नावावर केला. मुंबईकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ३९चेंडूत दोन चौकार आणि ५ षटकारासह ५१ धावा केल्या.

लखनौ विरुद्ध दिल्ली यांच्यात रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ४५वा सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा लखनऊकडून केएल राहुल याने कर्णधार खेळी केली. त्याने सलामीला फलंदाजीला येत खणखणीत अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने काही आकर्षक षटकार मारले आणि नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.राहुलने दिल्लीच्या गोलंदाजांवर दडपण आणत त्यांची मनसोक्त धुलाई केली.

३५ चेंडूंमध्येच त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. दरम्यान दहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर कुलदीप यादवला षटकार शमारत त्याने आपल्या आयपीएलमधील १५० षटकारांचा आकडा गाठला आहे. भारताकडून सर्वात कमी डाव खेळताना त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. याबाबतीत राहुलने संजू सॅमसन, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकले. राहुलने केवळ ९५ डावांमध्ये आपल्या १५० षटकारांचा पल्ला ओलांडलाराजस्थानचा विद्यमान कर्णधार संजूला हा पराक्रम करण्यासाठी १२५ डाव लागले तर रैनाने १२८, रोहितने १२९ आणि विराटने १३२ डावांमध्ये १५० षटकार पूर्ण केले होते.

लखनौने दिल्लीवर ६ धावांनी विजय मिळवला आणि प्ले ऑफ पक्के केले लखनौच्या १९५ धावांचा पाठलाग करणे दिल्लीच्या संघाला जमले नाही. त्यांनी फक्त१८९ धावा जमवल्या. इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ४६ वा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथून हैदराबाद विरुद्ध चेन्नई संघात पार पडला. हा सामना चेन्नईने १३ धावांनी जिंकून हंगामातील तिसरा विजय नोंदवला.

या विजयात ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे आणि मुकेश चौधरी यांनी मोलाचे योगदान दिले. ऋतुराजला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यातून एमएस धोनीने कर्णधार म्हणून पुनरागमन केले खरंतर आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वीच धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडून ही जबाबदारी रविंद्र जडेजाकडे सोपवली होती. मात्र, पहिल्या ८ सामन्यांनंतर जडेजाने वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देत ही जबाबदारी पुन्हा एकदा धोनीकडे सोपवली. धोनीनेही जबाबदारी पुन्हा हाती घेताच चेन्नईने विजय मिळवला.

ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ चेंडूत १८२ धावांची भागीदारी पार पाडली. चेन्नई साठी एखाद्या जोडीने केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. ही भागीदारी अजून मोठी होऊ शकत होती, पण ऋतुराज गायकवाड ९९ धावावर झेलबाद झाला आणि भागीदारी देखील तुटली. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने या धावा केल्या. डेवॉन कॉनवे मात्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला. कॉनवेने ५५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा उभ्या केल्या. या दोघांच्या प्रदर्शनामुळे सीएसकेने २ विकेट्सच्या नुकसानावर २०२ धावा जमवल्या.

शनिवारी आणि रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यातील वैशिष्ट्य म्हणजे शनिवारी टारगेट चेस करणारे संघ ंिजकले तर रविवारी प्रथम फलंदाजी करणा-या संघानी विजय मिळवला मुंबई आणि पुण्यात झालेल्या रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यात पराभूत होणारे संघ १८९धावा जमवू शकले चेन्नईच्या २०२धावांविरुद्ध हैदराबाद १८९ तर लखनऊ च्या १९५धावांसमोर दिल्लीचा संघही १८९ आवाज अमु शकला हा एक योगायोग.
– डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या