27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयनोकरदारांसाठी नवा महागाई निर्देशांक; महागाई भत्त्याची सवलत ठरवणे होणार सोपे

नोकरदारांसाठी नवा महागाई निर्देशांक; महागाई भत्त्याची सवलत ठरवणे होणार सोपे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : औद्योगिक आस्थापनांतून, कारखान्यांतून काम करणा-या नोकरदारांसाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवा महागाई निर्देशांक सुरू केला. सरकारी कर्मचा-यांना मिळणारा महागाई भत्ता मोजणे, औद्योगिक कर्मचा-यांचे वेतन ठरवणे आणि पेन्शनरांना देण्यात येणा-या महागाई भत्त्याची सवलत ठरवणे या कामांसाठी नव्या निर्देशांकाचा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे संघटित क्षेत्रातील नोकरदारांच्या खर्च करण्याच्या बदलत्या सवयींचा मागोवाही या निर्देशांकामुळे सहज घेता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, नोकरदारांची खर्च करण्याची पद्धत सध्या बदलली आहे. कोरोनामुळे बहुतांश नोकरदार घरून काम करत आहेत. काही जणांना रोजगार गमवावा लागला असून अनेकांची वेतनकपात झाली आहे. यामुळे खर्चाचे प्राधान्यक्रमही बदलले आहेत. परिणामी, खर्च करण्याची सवयही बदलत चालली आहे. बाजारातील अनेक वस्तूंच्या किंमतींत बदल झाला आहे. या सर्वांचे मोजमाप करण्यासाठी नवा नोकरदार महागाई निर्देशांक उपयुक्त ठरणार आहे.

नव्या निर्देशांकात शिक्षण, आरोग्य (हेल्थकेअर), हाऊसिंग, पर्यटन, मालवाहतूक या क्षेत्रांवर अधिक भर देण्यात आला आहे. यामुळे नोकरदार कुटुंबांचे अर्थकारण समजून घेण्यासाठी तसेच या वर्गातील महागाई मोजण्यासाठी अर्थतज्ज्ञांना या निर्देशांकाचा उपयोग होणार आहे. जुन्या सीपीआयमध्ये अन्न, खाद्यपदार्थ यांचा ४६.२ टक्के वाटा होता, जो नव्या निर्देशांकात ३९ टक्क्यांवर आणला आहे. हाऊसिंगचा वाटा १५.२ टक्क्यांवरून १६.८ टक्के केला आहे. शिक्षण, आरोग्य आदींचा वाटा जुन्या निर्देशांकात १६ टक्के होता, जो आता ३० टक्के केला आहे.

हा निर्देशांक म्हणजे महत्त्वाचे आर्थिक निर्देशांक ठरेल. या निर्देशांकामुळे लाखो नोकरदारांना बसणारी महागाईची झळ मोजणे शक्य होईल. या निर्देशांकाची ही नवी मालिका सर्वच प्रकारची धोरणे छरवताना उपयुक्त ठरणार आहे. सीपीआय हा ऐतिहासिक निर्देशांक असून तो १९४६ पासून सातत्याने प्रसिद्ध केला जात आहे, असे केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी म्हटले आहे.

निर्देशांक मोजण्याची पद्धत
महागाई निर्देशांकाच्या या नव्या मालिकेमध्ये औद्योगिक नोकरदारांचा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय-आयडब्ल्यू) मोजण्यासाठी सन २००१ ऐवजी सन २०१६ हे वर्ष आधारभूत म्हणून धरण्यात आले आहे. वस्तू वापराच्या बदललेल्या पद्धती, वस्तूंच्या किमतींत झालेले चढउतार, नियमित नोकरी करणा-या वर्गाची बदललेली खर्च करण्याची पद्धत यामुळे महागाई निर्देशांकाची ही नवी पद्धत सुरू करण्यात आली आहे. हा निर्देशांक मोजताना संघटित क्षेत्रातील औद्योगिक नोकरदारांना मिळणारे वेतन व भत्ते यांचा विचार केला जाणार आहे. या औद्योगिक नोकरदारांमध्ये बँक कर्मचारी व विमा कर्मचारी यांचाही समावेश करण्यात आला आहे.

सिरम इन्स्टिट्यूट पाच कोरोना लसींचे १०० कोटी डोस तयार करणार- अदर पूनावाला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या