24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय१ जुलैपासून नवा कामगार कायदा

१ जुलैपासून नवा कामगार कायदा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नव्या कामगार कायद्याची गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. परंतु, यंदा मोदी सरकार १ जुलैचा मुहूर्त टाळण्याच्या मनस्थितीत नाही. नवा लेबर कोड येत्या १ जुलैपासून लागू करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे.या नव्या कामगार कायद्यामुळे कर्मचारी, कामगारांच्या आयुष्यात खूप मोठे बदल होणार आहेत.

हे बदल ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार फायद्या- तोट्याचे असणार आहेत. कामाच्या वेळा, ‘पीएफ’मधील अंशदान, प्रत्यक्ष हातात येणारा पगार यामध्ये बदल होणार आहेत. सरकार शक्य तितक्या लवकर चार नवीन कामगार संहिता लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नवीन कामगार कायद्यांमुळे देशातील गुंतवणुकीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा सरकारचा दावा आहे.

केंद्र सरकारने जरी नवा कामगार कायदा लागू केला तरी देखील राज्यांना तो बदलण्याची मुभा आहे. केंद्राने हा कायदा संसदेत संमत केला आहे. त्यामुळे यावर २२ राज्यांनी तयारी पूर्ण केली आहे. अन्य सात राज्यांनी तयारी सुरु केली आहे. यामुळे हा कायदा देशभरात लागू होणार हे स्पष्ट झाले आहे.

नवा कामगार कायदा लागू झाल्यास कंपन्या कामाचे तास ८-९ तासांवरून १२ तासांपर्यंत वाढवू शकतात. परंतु, यानंतर कर्मचा-यांना तीन दिवसांची साप्ताहिक सुटी द्यावी लागणार आहे. आठवड्याला एकूण किती तास काम झाले पाहिजे, याच्या मर्यादेत बदल केला जाणार नाही. याचबरोबर ओव्हरटाईमच्या तासांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रातील कंपन्या तीन महिन्यांत कर्मचा-यांकडून ५० तासांऐवजी १२५ तासांपर्यंत जादा तास काम करून घेऊ शकतात.

नव्या लेबर कोडनुसार पीएफचे कॉन्ट्रीब्युशन देखील वाढणार आहे. यामुळे कंपन्यांच्या सीटीसीमध्ये बदल होतील. कंपन्या सीटीसीमध्ये कर्मचा-यांचा पीएफ आणि कंपनी देत असलेला पीएफ एकत्र करतात. नव्या कायद्यामुळे कंपन्या आपल्यावरील भार कर्मचा-यांच्या सीटीसीवर टाकण्याची शक्यता आहे.

फायदा असा की, कर्मचा-यांना भविष्यात म्हणजेच निवृत्तीनंतर जादाची रक्कम मिळणार आहे. परंतु तोटा असा की कर्मचा-यांना सध्या हातात येत असलेला पगार म्हणजेच टेक होम सॅलरी कमी होणार आहे. नव्या कोडनुसार बेसिक सॅलरी ही ५० टक्के होणार असल्याने पीएफमध्ये जास्त रक्कम जाणार आहे. निवृत्तीनंतर मिळणारे पैसे आणि ग्रॅच्युइटीची रक्कमही वाढणार आहे.

सुट्या एनकॅश करता येणार…
कर्मचारी आपल्या सुट्या पुढील वर्षी कॅरिफॉरवर्ड करू शकतो. ब-याच ठिकाणी सहा-सहा महिन्यांनी उरलेल्या सुट्या लॅप्स होतात. आता उरलेल्या सुट्यांचे कंपनीकडून पैसे देखील मिळविता येणार आहेत. याचबरोबर रजेसाठी पात्रता कालावधी हा २४० दिवसांवरून १८० दिवस करण्यात आला आहे. २० दिवसांमागे एक सुटीचा नियम तसाच ठेवण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या