21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयउपचाराच्या नव्या पद्धतीने कोरोनाचा प्रसार रोखता येणार

उपचाराच्या नव्या पद्धतीने कोरोनाचा प्रसार रोखता येणार

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले उपचार; कोरोनाच्या संसर्गाला आळा घालणे गरजेचे

एकमत ऑनलाईन

चेन्नई : तामिळनाडुच्या अलगप्पा महाविद्यालय आणि स्वीडनच्या केडीएच रॉयल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधानुसार संशोधकांनी औषध आणि मिश्रणांची एक सुची तयार केली आहे. यांवर संक्रमणाच्या उपाचारांच्या अनुशंगाने चाचणी केली जाणार आहे. ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ या जर्नलमध्ये हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

‘ड्रगबँक’ आकड्यांच्या अध्ययनावर आधारीत हा शोध जर्नल ‘साइंटिफिक रिपोर्ट्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या प्रकाशित लेखातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस कोणत्या पद्धतीने हल्ला करतो. याबाबत अधिक परिक्षण सुरू आहे. या संशोधनाचे प्रमुख वैभव श्रीवास्तव आणि अरूल मुरुगन यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन उपचारपद्धतीमुळे व्हायरसचा प्रसार कमी होण्यासाठी मदत होईल. जॉन हॉपंिकस युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार देशात संक्रमणामुळे आतापर्यंत २ लाख ८० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गळाभेट घेणे हा जवळचा संपर्क मानला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्राच्या एंजेसीने कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा जास्त धोका असलेल्या देशातील लोकांना गळाभेट न घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रोटिन्सला नष्ट केल्यास कोरोना नष्ट?
श्रीवास्तव यांनी सांगितले की, व्हायरस खूप वेगाने आपला प्रसार वाढवत आहे. कारण व्हायरस प्रोटीनमध्ये सतत बदल होत असतो. श्रीवास्तव यांनी सांगितले की, अशा कोणत्याही औषधामुळे व्हायरसच्या अनेक प्रोटिन्सचा नष्ट करता येऊ शकते. असे गुण उपलब्ध असतील, अशी वेगवेगळी औषध शोधण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

जास्त जवळ जाणे टाळा
जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकात्कालीन प्रमुख डॉ. माइकल रेयान यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होत मृतांचा आकडा वाढत आहे. म्हणूनच लोकांनी आपल्या प्रियजनांच्या जास्त जवळ जाण्यापेक्षा दूर राहून संवाद साधायला हवा.

कमी कालावधीत मृत्यू होणे चिंताजनक
डॉ. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत माहामारीचा प्रकोप वाढत आहे. अमेरिकेत चांगली आरोग्य प्रणाली आणि अधुनिक तंत्रज्ञान विकसित आहे. तरिही कमी कालावधीत संक्रमण झाल्याने एक ते दोन लोकांचा मृत्यू होणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचे एकूण तीन तृतीयांश केसेस अमेरिकेत आहेत.

बनावट नोटा चलनात आणणारे त्रिकूट जाळ्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या