26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयमहिलांच्या सुरक्षेसाठी केंद्राची नवी नियमावली

महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्राची नवी नियमावली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हाथरसच्या घटनेत पोलिसांच्या कार्यवाहीवर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हाच्या पार्श्वभूमीवर देशातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्राने आता राज्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली जाहीर करताना केंद्राने म्हटले की, महिला सुरक्षेच्या नियमांचे पालन करताना पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे योग्य प्रकारे न्याय मिळू शकत नाही.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि मृत्यू प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने देशभरात उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांविरोधात उद्रेक झाला होता. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने तीन पानाची नवी सविस्तर नियमावली तयार केली आहे.

काय आहेत नवे नियम?
सीआरपीसीमध्ये उल्लेख केलेल्या गुन्ह्यांमध्ये एफआयआर नोंदवणे अनिवार्य आहे. महिलेवर लैंगिक अत्याचारासह इतर गंभीर गुन्हा संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीबाहेर घडला असला तरी कायदा पोलिसांना झिरो एफआयआर आणि एफआयआर दाखल करण्याचा अधिकार देतो.

अनिवार्य प्रक्रियेचे पालन करणे गरजेचे
कायद्यांतील कडक तरतुदी आणि विश्वास टिकवण्यासाठी इतर पावले उचलण्याशिवाय पोलिस जर अनिवार्य प्रक्रियेचे पालन करण्यास अयशस्वी ठरले तर देशाच्या फौजदारी न्यायप्रणालित योग्य न्याय देण्यात बाधा निर्माण होते.

निष्काळजी करणा-या अधिका-यावर होणार कारवाई
त्यामुळे अशा प्रकारच्या त्रृटी समोर आल्यानतंर त्याची पडताळणी करुन तात्काळ संबंधित जबाबदार अधिका-याविरोधात कडक कारवाई करण्यात यायला हवी, असेही राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पाठवलेल्या नव्या नियमावलीमध्ये म्हटले आहे.

संयमाची परीक्षा न घेता न्याय द्या, यापुढे संयमी नसणार – छत्रपती संभाजीराजे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या