22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeक्रीडाआयर्लंडला हरवत न्यूझिलंडच्या संघाने सेमीफायनलची शर्यत जिंकली

आयर्लंडला हरवत न्यूझिलंडच्या संघाने सेमीफायनलची शर्यत जिंकली

एकमत ऑनलाईन

अ‍ॅडलेड : टी-२० विश्वचषकातील ३७ व्या सामन्यात न्यूझिलंडच्या संघाने आयर्लंडचा ३५ धावांनी पराभव करत सेमीफायनलचे तिकिट मिळवले आहे.

या स्पर्धेत सेमीफायनलचे स्थान गाठणारा न्यूझिलंड पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघाने न्यूझिलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

त्यानंतर न्यूझिलंडच्या संघाने निर्धारित २० षटकांत आयर्लंडसमोर १८६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ १५० धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात झंझावाती अर्धशतकी खेळी करणारा न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या