20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeक्रीडान्यूझीलंडचे पाकला १५३ धावांचे आव्हान; केनसह मिशेलची एकहाती झुंज

न्यूझीलंडचे पाकला १५३ धावांचे आव्हान; केनसह मिशेलची एकहाती झुंज

एकमत ऑनलाईन

सिडनी : टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना केवळ १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. यावेळी कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल या दोघांनी एकहाती झुंज दिल्यामुळं धावसंख्या इथवर पोहोचली आहे.

दोन्ही संघासाठी फायनल गाठण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणा-या या सामन्यात प्रथम फलंदाजी न्यूझीलंडनं घेतली. एक मोठी धावसंख्या करुन पाकिस्तावर प्रेशर देण्याचा डाव त्यांचा होता.

पण पाकिस्तानी गोलंदाजानी सुरुवातीपासून दमदार अशी गोलंदाजी केली. ज्यामुळे न्यूझीलंडनं सुरुवातीपासून विकेट गमावल्या. फिन अ‍ॅलन ४ तर कॉन्वे २१ धावा करुन बाद झाला. ग्लेन फिलिप्सही ६ धावांवर तंबूत परतला.

नंतर मात्र केन आणि मिशेलनं डाव सावरला. केन ४६ धावांवर बाद झाला तर मिशेलनं नाबाद ५३ धावा केल्या. नीशमनंही नाबाद १६ धावाचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं २ तर मोहम्मद नवाजनं एक विकेट घेतली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या