न्यूझिलंड क्रिकेट संकटात

    322
    १० ते १५ टक्के कर्मचा-यांना काढून टाकणार

    नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे न्यूझिलंड क्रिकेटवर (एनझेडसी) वाईट परिणाम झाला आहे. ६० लाख डॉलर्सची बचत करण्यासाठी मंडळाने आपल्या कर्मचा-यांपैकी १० ते १५ टक्के कर्मचा-यांना नोकरीवररून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

    सहा मोठ्या संघटना, जिल्हा व क्लब यांना वित्तपुरवठा करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या वर्षाची प्राथमिकता  निश्चित आहे ज्याच्याशी आपण तडजोड करू शकत नाही. आम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही. एनझेडसीकडून कपात करण्यात येत आहे.

    Read More  दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंप

    व्हाईट पुढे म्हणाले, न्यूझिलंडमधील इतर व्यवसायही हे नुकसान अनुभवत आहेत. ही एक अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि आपल्याला यावर मात केली पाहिजे, जेणेकरून आपण न्यूझिलंड क्रिकेटला मजबूत बनवू शकू. आमचे सदस्यही चांगली कामगिरी करतील. कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे.