Tuesday, September 26, 2023

नवनिर्वाचित आमदार रणजितसिंह मोहिते अकलूजमध्ये होम क्वारंटाइन

मुंबई: विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर मुंबईत आमदारकीची शपथ घेऊन आपल्या गावी अकलूजला परतलेले भाजपा नेते आमदार रणजितसिंह मोहिते यांनी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १४ दिवसांसाठी स्वतः होम क्वारंटाइनमध्ये राहणे पसंत केले आहे.

Read More  विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्ट्रीने अंतीम सत्राच्या परीक्षा रद्द करा!

विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर काल सोमवारी मुंबईत विधान भवनात रणजितसिंह मोहिते यांनी आमदारकीची शपथ घेतली होती. शपथविधी पूर्ण करून रात्री ते आपल्या गावी अकलूजला परतले. परंतू करोना प्रादुर्भाव असलेल्या मुंबई व पुण्यासह ह्यरेडह्ण व ह्यऑरेंज झोनह्णमधून प्रवास करून आल्यामुळे आमदार मोहिते यांनी मंगळवारी सकाळी अकलूजमध्ये उपजिल्हा रूग्णालयात जाऊन स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली.

त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते यांच्यासह स्वीय सहायक बापू शितोळे, चालक किसन कदम व मधुकर घोगरे हे सुध्दा मुंबईला गेले होते. या सर्वांनी १४ दिवसांपर्यंत स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या