21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमहाराष्ट्रवृत्त निराधार : माझ्या तोंडी चुकीचे विधान घालण्यात आले - गृहमंत्री अनिल...

वृत्त निराधार : माझ्या तोंडी चुकीचे विधान घालण्यात आले – गृहमंत्री अनिल देशमुख

एकमत ऑनलाईन

पुणे : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला असे चुकीचे विधान माझ्या तोंडी घालण्यात आले आहे. मी असे काही बोललो नाही, हे वृत्त निराधार आहे असा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनेने त्यांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसारीत केले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले होते. तसेच सध्या झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या हा रुटीनचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एका वृत्तपत्राच्या ऑनलाइनच्या कार्यक्रमात गृहमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी संबंधीत वृत्तपत्राने महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले.

एवढंच नाही तर, शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले असे देशमुख यांच्या नावाने वृत्त प्रसिध्द केले होते. यावर देशमुख यांनी वृत्त निराधार असल्याचे तसेच संबंधीत वृत्ताची व्हिडिओ क्‍लिपींग बघितल्यास वस्तुस्थिती कळेल असे स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या