नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला असून बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. उत्तर प्रदेशच्या अभ्यासक्रमातून मुघलांशी संबंधित प्रकरण काढून टाकण्यात आली आहेत. आता या प्रकरणावर एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी माध्यमांना सांगितले की, एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांवरील प्रकरण काढून टाकण्याचे वृत्त चुकीचे आहे, अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.
सकलानी म्हणाले, “हे खोटे आहे. मुघल इतिहास काढला गेला नाही. गेल्या कोविडमुळे मुलांवर खूप दबाव होता. तज्ञ समितीने सहावी ते बारावीच्या पुस्तकांची पुनर्तपासणी करून सूचना केल्या की, एक धडा काढला तर मुलांच्या ज्ञानावर परिणाम होणार नाही आणि अनावश्यक दडपण दूर होईल. ही निरर्थक चर्चा आहे. ज्यांना माहिती नाही ते पुस्तकं पाहू शकतात. “इयत्ता १२ वी मध्ये मुघल कालखंडावर एक चांगले प्रकरण शिकवले गेले पाहिजे, जेणेकरून त्याची धोरणे आणि कृती कळतील. असे ते म्हणाले
या विषयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी योगी सरकार वॉर टीकेची झोड उठवली होती. व या संधर्भात वेगवेगळ्या सूचना केल्या होत्या.