16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रपुढच्या वर्षी अजित पवार करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा

पुढच्या वर्षी अजित पवार करणार विठ्ठलाची शासकीय महापूजा

एकमत ऑनलाईन

शिर्डी : विठ्ठलाची पुढची शासकीय महापूजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल, अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री असतील आणि तेच शासकीय पूजा करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन झाले. मात्र, हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातो. असाच दावा आता मिटकरी यांनी केला आहे. शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचे दोन दिवसीय चिंतन शिबिर सुरू झाले आहे. यासाठी अनेक नेते याठिकाणी आले आहेत.

यावेळी ते म्हणाले, की अजित दादांसारखे नेतृत्व महाराष्ट्राला लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे. आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे आता येणा-या कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा दावा त्यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या