16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयडी गँगच्या चौघांविरुद्ध एनआयएचे आरोपपत्र

डी गँगच्या चौघांविरुद्ध एनआयएचे आरोपपत्र

एकमत ऑनलाईन

दहशतवादी कारवायासाठी खंडणीचा वापर!
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गँगविरोधात एनआयएकडून चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. डी गँगने उकळलेल्या खंडणीचा वापर दहतवादासाठी करत असल्याचे समोर आल्यानंतर एनआयएने ही कारवाई केलीे. दाऊदकडून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी खंडणीच्या पैशाचा वापर केला जात आहे, असा एनआयएने आरोप केला आहे.

एनआयकडून या पूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून दाऊदसह आणखी काही जणांना वॉंन्टेड घोषित करण्यात आले आहे. श्रीमंत लोकांकडून खंडणी उकळून त्याचा वापर दहशतवादासाठी करण्यात येत होता. अटक करण्यात आलेल्या तिघांना हवालाकडून पैसे मिळत होते. हवालातून मिळालेल्या पैशाचा वापर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी केला जात होता, अशी माहिती एनआयएला मिळाली. त्यावरून एनआयएने ही कारवाई केली.

डी गँंगशी संबंधित खंडणी प्रकरणी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही टेरर फंडिंग प्रकरणात अटकेत आहेत. एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात या दोघांसह दाऊद आणि छोटा शकीलचा समावेश आहे. सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा साडू आहे. डी गँग आणि छोटा शकीलच्या नावाने सलीम फ्रुट हा धमकी देऊन खंडणी गोळा करत असे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सलीमला अटक करण्यात आली आहे.

खंडणीसाठी सलीम द्यायचा धमक्या
खंडणीसाठी सलीम संबंधित व्यवसायिकाला धमकी द्यायचा. तसेच तक्रारदाराची महागडी रेंज रोव्हर गाडी त्याने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती. आरोपींनी जबरदस्तीने ६५ लाखांची रोख रक्कमही ताब्यात घेतली होती. या प्रकरणात हवालामार्गे पैसे बाहेर पाठवण्यात आल्याचा आरोप एनआयएने त्यांच्या आरोपपत्रात केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या