27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयअमरावतीत एनआयएचे छापे

अमरावतीत एनआयएचे छापे

एकमत ऑनलाईन

कोल्हे हत्या प्रकरणी अनेक पुरावे हाती
अमरावती : केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. एनआयएने आज अमरावतीमधील १३ ठिकाणी धाडी टाकून शोध मोहीम राबवली. या छापे सत्रातून एनआयएच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागल्याची माहिती आहे.

केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या २१ जूनला रात्री १० च्या सुमारास झाली. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने कोल्हे यांची हत्या झाली. मात्र सुरुवातीला हे प्रकरण दरोड्याचे असल्याचे भासवण्यात आले. २२ जूनला या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला. शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळेच कोल्हेंची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. २ जुलैला एनआयएने कोल्हेंच्या हत्येचा तपास सुरू केला.

नवे सीसीटीव्ही फुटेज समोर
केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्याकांड प्रकरणाशी संबंधित एक नवे सीसीटीव्ही फुटेज काल समोर आले. हे फुटेज अतिशय धक्कादायक आहे. उमेश कोल्हे यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना गुडघ्यावर बसायला लावण्यात आले. यानंतर त्यांच्या मानेवर चाकूनं वार करण्यात आले. हत्या करण्याची ही पद्धत आयसिस या दहशतवादी संघटनेसारखी आहे. अशा प्रकारच्या अनेक हत्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी केल्या होत्या. त्या हत्यांचे व्हिडीओदेखील आयसिसने जारी केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या