नवी दिल्ली : देशात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) देशातील सहा राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. तीन वेगवेगळ्या केसाच्या संदर्भात एनआयएने हे छापे टाकले आहेत. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत.
शिख फॉर जस्टिस (एसएफजे) या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेच्या ठिकाणावर एनआयएकडून झडती घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तीन वेगवेगळ्या प्रकरणात हे छापे पडत आहेत. हे तिन्ही गुन्हे एनआयएने गेल्या वर्षी नोंदवले होते.