Saturday, September 23, 2023

बस-ट्रकच्या अपघातात ९ जण जागीच ठार

भागलपूर: वृत्तसंस्था
बिहारमधील भागलपुर येथे झालेल्या एका भीषण अपघातात नऊ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मजुरांनी भरलेला ट्रक आणि बसमध्ये हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळावर तात्काळ दाखल जाले. जखमींना उपचारासाठी जवळील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More  सोलापुरहून झारखंड मजूर घेऊन जाणा-या बसला अपघात

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधून मजुरांना घेऊन जात होते. त्यावेळी ट्रक आणि बसची धडक झाली. त्यानंतर ट्रक उलटून दरीत कोसळला. घटनास्थळावरच नऊ जणांचा मृत्यू झाला. आज, मंगळवारी सकाळी महाराष्ट्रामध्येही यवतमाळ जवळ मजुरांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर १५ जखमी झाले आहेत.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या