22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रधर्म परिवर्तनाचा मुद्दा नितेश राणेंनी सभागृहात मांडला ; सनसनाटी दावे करत लक्ष...

धर्म परिवर्तनाचा मुद्दा नितेश राणेंनी सभागृहात मांडला ; सनसनाटी दावे करत लक्ष वेधले

एकमत ऑनलाईन

मुंबई : अहमदनगरमधील श्रीरामपूरच्या घटनेच्या अनुषंगाने लक्षवेधीच्या माध्यमातून भाजप आमदार नितेश राणे यांनी धर्म परिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. हिंदू तरुणीला फसवून तिचे धर्मांतर घडवून आणले तर सात लाख रुपयांपर्यंत पैसे मुस्लिम तरुणांना मिळतात, असा सनसनाटी दावा नितेश राणे यांनी केला. धर्म परिवर्तन घडवून आणल्यानंतर मुस्लिम तरुणांना लाखो रुपये मिळतात, असा दावा करत मिळणा-या पैशांचे रेट कार्डच नितेश राणे यांनी सभागृहात वाचून दाखवले.

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे तर कामकाजाचा आज पाचवा दिवस आहे. आज कामकाजाच्या सुरुवातीलाच नितेश राणे यांनी नगरमधल्या श्रीरामपूरच्या घटनेच्या अनुषंगाने लक्षवेधी मांडली. यावेळी धर्मांतरच्या मुद्द्यावरुन त्यांनी अनेक गंभीर दावे केले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात धर्मपरिवर्तनाचा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं सांगत नितेश राणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

नितेश राणे म्हणाले, अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर केले जाते. त्याबदल्यात मुस्लिम मुलांना लाखो रुपये मिळतात. यामध्ये अनेक बिगर मुस्लिम तरुणींची फसवणूक होते, त्यांचे शोषण केले जाते, त्यांच्यावर अत्याचार केले जातात.

महाराष्ट्रातल्या श्रीरामपूरची घटना आपल्या डोळ्यासमोर आहे. पोलिसांची भूमिका देखील त्यावेळी सहकार्य करणारी नसते, असे अनेक दावे करत नितेश राणे यांनी धर्म परिवर्तनाबद्दल मुस्लिम तरुणांना मिळणा-या पैशांचे रेट कार्डच नितेश राणे यांनी सभागृहात वाचून दाखवले. तसेच महाराष्ट्र सरकारने याबाबत गंभीर पावले उचचलण्याची आवश्यकता असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्रात गुजरात आणि कर्नाटकसारखे कडक कायदे करावेत, अशी मागणी राणेंनी केली.

जबरदस्ती धर्मांतर करता येत नाही – फडणवीस
नितेश राणे यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नितेश राणे यांनी मांडलेला विषय गंभीर आहे. राज्यात धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात आहे. जबरदस्ती कोणी कुणाचे धर्मांतर करू शकत नाही. या तरतुदींमध्ये कमतरता असेल तर अभ्यास करून या तरतुदी टोकदार करू, कुठेही आमिष देऊन किंवा जबरदस्ती करून कोणाचे धर्मांतर करता येत नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या