रांची : बिहारचे मुख्यामंत्री नितीश कुमार के देशातील सर्व विरोधी पक्षांचय पक्षांच्या नेत्यांना एका मंचाखानी आणण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी मागील काही दिवसामध्ये राहुल गांधी, अरंिवद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव व अन्य प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. आता या यादीत झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव समाविष्ट झाले आहे. त्यांनी बुधवारी रांची येथे झारखंड के मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित होते. यावेळी नितीश म्हणाले, आम्ही आज विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि आम्ही देशाच्या हितासाठी एकजुटीने काम करू यावर सहमती बनली.