24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयनितीश कुमार उद्या आठव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार उद्या आठव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

एकमत ऑनलाईन

पाटणा : जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडत असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. त्यांनी राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. तोच आता ते उद्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या साथीने नव्याने बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बुधवारी सायंकाळी ४ वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नितीश यांनी भाजपची साथ सोडली असून त्यांनी राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेतले आहे. उद्या आठव्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागु चौहान यांच्याकडे राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. तसेच नितीश यांना राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून पुढे शपथविधी होऊपर्यंत काम पाहण्याची विनंती राज्यपाल चौहान यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या