24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeबिहारमध्ये नितीशराजच

बिहारमध्ये नितीशराजच

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. जदयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताच भाजपा आमदारांनी सभात्याग केला. या विशेष अधिवेशनात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे सरकारचे तीन जावई आहेत, असे ते म्हणाले.

२४३ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत १६० जणांनी पाठिंबा दिला. आवाजी मतदानाने पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री नितीशकुमार बोलत असतानाच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सभात्याग केला. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाची फक्त औपचारिताच राहिली होती. यावेळी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली आणि ही आघाडी ऐतिहासिक असल्याचे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या