26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच!

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच!

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचे सांगितले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंनी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंशी प्रतारणा नाहीच, असेही म्हटले आहे. या ट्विटची आता जोरदार चर्चा सुरू आहे.

आपल्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन.

याबरोबरच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही शेअर केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला तसेच आनंद दिघेंच्या ठाण्यातल्या आश्रमालाही भेट देणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या