27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रभारतीय पेहराव नसल्यास शिर्डीत ‘नो एन्ट्री’

भारतीय पेहराव नसल्यास शिर्डीत ‘नो एन्ट्री’

एकमत ऑनलाईन

शिर्डी : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ब-याच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मंदिरे खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात आला. या निर्णयांतर्गत मंदिरे खुली झाली आणि भाविकांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठीसुद्धा देश- विदेशातून भाविक येत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. पण, यातील काही भाविकांना मात्र अडवण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

मंदिरात येणा-या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनास यावे, असा आग्रह मंदिर प्रशासनाकडून करण्यात आल्याचे वृत्त हाती येत आहे. मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची तूर्तास सक्ती करण्यात आलेली नसली तरीही त्यासंबंधीचे फलक मात्र येथे लावण्यात आले आहेत. तीन भाषांमध्ये हे फलक लावण्यात आले असून, भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीपर मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांपैकी काहीजण हे तोकड्या कपड्यांमध्ये असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे़ किंबहुना यापैकी काही भाविकांना अडवत त्यांना भारतीय पेहरावासाठीची विनंतीही करण्यात आली. या निर्णयाचे काही भाविकांनी स्वागत केले. पण, त्याबाबत संमिश्र प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.

मुख्य म्हणजे अद्यापही या निर्णयाची सक्ती नसली तरीही मंदिर परिसरात लावण्यात आलेले फलक पाहता येत्या काळात या निर्णयाच्या मुद्यावरुन काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आणि मतमतांतरे समोर येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, भारतातील अनेक मंदिरांमध्ये भारतीय पोषाखातच दर्शनाची मुभा देण्यात आली आहे. दक्षिण भारतातील गुरूवायूर मंदिर किंवा अमृतसरमधील सुवर्णय मंदिर या ठिकाणी प्रवेशासाठी ठराविक पेहरावाचीच विनंती मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आणि भाविकांनी त्याचं स्वागतही केले. आता शिर्डीच्या बाबतीच हेच चित्र पाहायला मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आघाडीचं सरकार आलं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते – नारायण राणे यांचा दावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या