38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeनोकरी नाहीये? मग हजार नोकऱ्यांची ही संधी तुमच्यासाठीच -जिल्हाधिकारी शेखर सिंग

नोकरी नाहीये? मग हजार नोकऱ्यांची ही संधी तुमच्यासाठीच -जिल्हाधिकारी शेखर सिंग

एकमत ऑनलाईन

भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणी काम उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचं हे पहिलं पाऊल

सातारा : कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी मोठ-मोठाली शहरं दूर करुन गड्या आपला गाव बरा म्हणत गावांना जवळ केलं. इतर राज्यांतील कामगार वर्गानेही आपल्या घरच्यांची आणि स्वतःच्या जीवाची काळजी लक्षात घेऊन मिळेल त्या पद्धतीने गाव गाठण्याचा प्रयत्न केला. कष्टकरी आणि श्रमिक वर्गासाठी मागील ३ महिने हे आत्यंतिक हलाखीचे राहिले असले तरी आता झालेल्या प्रकारावर शोक व्यक्त करण्याऐवजी काम करणं, त्यावर उपाय शोधणं जास्त गरजेचं आहे.

साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्रात अशाच पद्धतीने काम उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योजकांनी आणि जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. साताऱ्यात कामासाठी असणारे इतर जिल्ह्यातील तसेच राज्यांतील हजारो मजूर आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासोबतच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एक नवीन उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आला आहे. विशेषतः पुण्या-मुंबईहून स्वगृही परतलेल्या मुला-मुलींच्या मोबाईल नंबरवर एका संदेशाद्वारे जिल्ह्यातील नवीन रोजगाराच्या संधींची माहिती देणारी लिंक पाठवण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील नोकरीसाठी लिंक – https://bit.ly/3dLLA1j

वर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांत उपलब्ध असणाऱ्या कंपन्या, त्या कंपन्यांमध्ये शिल्लक असणाऱ्या जागा, कामाचं स्वरुप याविषयीची माहिती मिळू शकते. या उपक्रमात उद्योजकांनी घेतलेला पुढाकारही महत्वाचा आहे. भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणी काम उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचं हे पहिलं पाऊल म्हणायला हरकत नाही. स्वतः जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतीत लक्ष घातलं असून यासंदर्भात ‘महास्वयम’ पोर्टलवर नावनोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. नोकरीसाठी इच्छुक नागरिकांनी अडचण आल्यास 02162-239938 (कार्यालय), 8999089322 (दीपक लोंढे), 9371608764 (सहकारी) या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

Read More  दिलासादायक : लातूर शहरातील पाच जणांची कोरोनावर मात

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या