27 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeतीन दिवसांपासून राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही : नितीन राऊतांचे स्पष्टीकरण

तीन दिवसांपासून राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही : नितीन राऊतांचे स्पष्टीकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एका वृृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना राज्यातील लोडशेडिंगबाबत सांगितले. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद, असे म्हणत नितीन राऊत यांनी भाजपला टोला लगावला. ते म्हणाले, आता तीन दिवस झाले राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही. भाजपमुळे वीज कंपन्या तोट्यात गेल्या होत्या. आम्ही त्या नफ्यात आणल्या. अपारंपरिक विजेचे सुधारित धोरण जनतेसाठी आहे. कॅबिनेटसमोर मांडण्यात आले आहे. २६ एप्रिल रोजी राज्यात विजेच्या संदर्भातील महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक खास निधीसाठी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये वाईट दर्जाचा कोळसा आहे. मी केंद्रीय कोळसा, रेल्वे, ऊर्जा आणि पेट्रोलियम मंत्र्यांना स्वत: भेटणार आहे.
मोहित कंबोज हल्ला प्रकरणावर नितीन राऊत म्हणाले, मोहित कंबोजवरील हल्ला चुकीचा असून आम्ही त्याचे समर्थन करत नाही. पण तुम्ही पण लोकांना उद्विग्न करताय का? टाळी दोन्ही हाताने वाजली आहे. तसेच किरीट सोमय्या यांबाबत देखील नितीन राऊत यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, किरीट सोमय्यांची सवय आहे. काही झाले की ते दिल्ली गाठतात. काय तिथे शिजतं ते माहिती नाही. यांना महापालिका हवी आहे ना मुंबईची, ती निवडणुकांच्या माध्यमातून जिंकावी.

महाराष्ट्र हा सुसंस्कृत
सध्या देशात सुरू असलेल्या धार्मिक घटनांबाबत नितीन राऊत म्हणाले, महाराष्ट्र हा तसा सुसंस्कृत. पण भाजप एक उन्माद तयार करते आहे, धार्मिक उन्माद तयार करते आहे आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण होतेय. याने दंगली होणार. कायदा-सुव्यवस्था आहे, पण ही मंडळी एक प्रकारचे धार्मिक अंधत्व निर्माण करायचा प्रयत्न करतेय.

हा राजकीय द्रोहच
एखाद्या धार्मिक स्तोत्राचे पठण करायचे असेल तर तो तुमचा खासगी प्रश्न आहे, तुम्ही दुस-याच्या घरी जाऊन करू शकत नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट वेठीस धरले आहे. हा राजकीय द्रोहच.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या