19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयअयोध्येत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी

अयोध्येत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी

एकमत ऑनलाईन

अयोध्या : अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणा-या राम मंदिर भूमिपूजनाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भूमिपूजनासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येचे उपमहानिरीक्षक दीपक कुमार यांनी अयोध्येमधील सुरक्षेची माहिती देताना कोविड प्रोटोकॉल पाळला जाणार असून पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल, अशी माहिती दिली आहे.

दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्या दौ-यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी सुरक्षेचा प्रोटोकॉल फॉलो केला जाणार आहे. तसेच कोविड प्रोटोकॉलही फॉलो केला जाणार आहे. कोविड योद्धाही तिथे उपस्थित असणार आहेत. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास बंदी आहे. शहरातील दुकाने सुरू असतील. आम्ही ड्रोनच्या माध्यमातून व्हीआयपी मार्गांवर नजर ठेवत आहोत. अयोध्येत राहत असलेल्या लोकांना शहरात फिरण्यावर बंदी नसेल. पण गरज नसल्याशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. बाहेरील लोकांना शहरात प्रवेशबंदी असेल, असे दीपक कुमार यांनी सांगितले.

भिंतीवर साकारले जातेय रामायण
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर रंगरंगोटी सुरू असून, येथे रस्त्यारस्त्यांवर रामायणातील कथा साकारल्या जात आहेत. तसेच भिंतीवर रामायणातील महत्त्वाची पात्रे साकारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे सचित्र रामायण साकारण्यासाठी मुस्लिम समाजाची मोठी टीम कार्यरत आहे.

अयोध्येत विविध कार्यक्रम
अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी होणा-या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने अयोध्येत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  आहे. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी रामनगरीत प्रत्येक घरात तुपाचे दीप लावले जाणार आहेत. तसेच शहरातील विविध मठ, मंदिरात सुंदरकांड, अखंड रामायणचे वाचन केले जाणार आहे. तसेच प्रत्येक घरावर श्रीरामाचे चित्र असलेले ध्वज लावले जात आहेत.

मोदींचा अयोध्या दौरा धार्मिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भूमिपूजन कार्यक्रम जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर सतत टीकास्त्र सोडण्यात येत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांचा अयोध्या दौरा हा पूर्णपणे धार्मिक दौरा असेल हे स्पष्ट झाले आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ११.१५ वाजता ते अयोध्येत पोहोचल्यावर सर्वप्रथम हनुमानगढी येथे भेट देतील. येथे पंतप्रधान पूजेसाठी सुमारे ३ मिनिटे इतकाच कालावधी घेतील, असे सांगण्यात आले.

अडवाणी, जोशींना निमंत्रणाची प्रतीक्षाच
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिराच्या लढाईतील अग्रणी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना अद्याप राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. दूरध्वनीवरूनही ट्रस्टच्या वतीने अद्याप संपर्क झालेला नाही, अशी माहिती अडवाणी यांच्या निकटवर्तीयांनी दिली. तसेच जोशी यांनाही निमंत्रणाची प्रतीक्षाच असल्याची माहिती आहे.

Read More  वाढता कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर महापालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या