23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रिकेटपटूंचे विलगीकरण नको

क्रिकेटपटूंचे विलगीकरण नको

एकमत ऑनलाईन

इरफानचा आयसीसीच्या नव्या नियमांवर आक्षेप

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन महिने ठप्प असलेले क्रिकेट सामने पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आयसीसीकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. क्रिकेटचा सराव सुरू करणे आणि क्रिकेट सामने खेळवणे अशा दोन्ही बाबींसाठी मिळून आयसीसीने सर्व सदस्यांसाठी काही महत्त्वाचे नियम तयार केले आहेत. या नियमामध्ये क्रिकेट मालिका सुरू होण्याआधी १४ दिवस कोणत्याही क्रिकेट संघाला क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. या नियमावरून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने आयसीसीला सवाल केला आहे.

‘‘वैयक्तिक खेळांमध्ये सोशल डिन्स्टन्सिंग हा प्रकार शक्य आहे, पण क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या सांघिक खेळांमध्ये शक्य नाही. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला विकेट किपरच्या बाजूला स्लीपचा फिल्डर हवा असेल, तर तुम्ही तो फिल्डर ठेवणार नाही का? त्याचसोबत प्रत्येक संघातील खेळाडूंना १४ दिवसांचा क्वारंटाईन काळ असेल असा नियम आहे. त्यात कोणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, तर त्याला क्रिकेटपासून दूर ठेवले जाईल. पण क्वारंटाईननंतर केवळ तंदुरुस्त खेळाडूच मैदानात उतरणार आहेत. अशा वेळी जर मैदानावरही नियम ठेवण्यात येत असतील, तर क्वारंटाईन कालावधीचा काय उपयोग?’’ असा सवाल इरफान पठाणने उपस्थित केला.

Read More  एमएचटी-सीईटी परीक्षा : विद्यार्थ्यांना 1 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत

‘‘सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे यात वादच नाही, पण त्याचसोबत खेळदेखील फार क्लिष्ट करून ठेवता कामा नये. प्रत्येक वेळी जर खेळाडूला चेंडूला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ करावे लागणार असतील, तर क्रिकेट खेळणं खूपच कठीण होऊन बसेल’’ असेही मत त्याने व्यक्त केले. आयसीसीच्या नव्या नियमांनुसार संघ व्यवस्थापनात प्रमुख वैद्यकीय अधिकाºयाची नेमणूक करावी लागणार आहे. खेळाडूंच्या सरावाची जागा आणि ड्रेसिंग रूम स्वच्छ (सॅनिटाईझ) ठेवावी लागणार असून सरकारी परवानगीशिवाय सामने खेळवता येणार नाहीत. सोशल डिस्टन्स्ािंगचा महत्त्वाचा नियम पाळण्यासाठी खेळाडूंची टोपी, गॉगल, टॉवेल, जर्सी पंच सांभाळू शकणार नाहीत. पंचांना स्वतंत्र ग्लोव्हज देण्यात येणार आहेत. तसेच, चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर न करण्यासाठी आयसीसीच्या समितीने याआधीच शिफारस केली आहे़

आयसीसीची मार्गदर्शक तत्त्वे
चेंडूला स्पर्श केल्यानंतर सातत्याने हात स्वच्छ करायचे, सरावादरम्यान बाथरूमला जायचे नाही, चेंजिंग रूममध्ये फार वेळ थांबायचे नाही, चेंडूवर लाळेचा (थुंकी) वापर करायचा नाही; तसेच टोपी, टॉवेल, गॉगलसारख्या आपल्या वैयक्तिक गोष्टी दुसºयांना द्यायच्या नाहीत़

भारतीय समालोचकही नाराज
क्रिकेट पुन्हा रूळावर आणण्या संदर्भात आयसीसीकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही नियमावली खूपच अपरिपक्व वाटते. कोणतेही नियम आताच ठरवणे हे घाईचे ठरेल, कारण परिस्थिती रोज बदलते आहे. सामना सुरू असताना चेंडूला स्पर्श झाला की प्रत्येक वेळी हात धुणे किंवा सॅनिटाईज करणे हे निव्वळ अशक्य आहे. तसेच जर संघाला सामन्याआधी पुरेशा दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे आणि सामने खेळताना ती जागा स्वच्छ केली जाणार आहे, तर सामना सुरू असताना अतिरिक्त नियमांची गरज काय? अन्यथा क्वारंटाईन राहण्याला काहीच अर्थ उरणार नाही. नियमावलीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन मैदानावर केले जाईल. पण त्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? जास्त नियमांचे कुंपण घातले तर खेळातील मजा नाहीशी होईल’’, असे चोप्राने सांगितलं. ‘‘फुटबॉल आणि क्रिकेट हे सांघिक खेळ आहेत. फुटबॉलच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आयसीसीने नियमावली तयार करण्याची घाई करू नये. फुटबॉल स्पर्धांच्या खेळाचा अभ्यास करावा. त्याने चित्र स्पष्ट होण्यास अधिक मदत होईल’’, असा सल्ला चोप्राने दिला.

एकाच वर्षी दोन ट्वेन्टी-२०
आॅस्ट्रेलियात या वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा प्रस्तावित ट्वेन्टी-२० विश्वचषक लांबणीवर टाकण्यात येणार की नाही याबाबतचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र पुढील वर्षी भारतातही आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक नियोजित आहे. या स्थितीत एकाच वर्षात सहा महिन्यांच्या अंतराने दोन वेळा ट्वेन्टी-२० विश्वचषक कसा खेळवायचा हा मुख्य प्रश्न आयसीसीपुढे आहे. याबाबत अर्थातच ‘आयसीसी’च्या सदस्यांचे एकमत होत नाही. ‘आयसीसी’च्या आर्थिक आणि व्यापार विभागाच्या समितीची व्हीडीओद्वारे झालेल्या बैठकीत ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी त्यासाठी उपस्थित होते. जर या वर्षी आॅस्ट्रेलियात होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवला तर सहाच महिन्यांच्या अंतराने भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक अशक्य आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या