मुंबई : शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, हे मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, कालपासून मी अनेक शिवसैनिकांशी संवाद साधतो आहे.
सगळ्यांच्या भावना दाटून आल्या आहेत. लोकांवरील दडपण हलके करणे माझे काम आहे. शिवसैनिकांवर दडपण वाढेल असे मी बोलणार नाही. पण कालच्या भेटीगाठीतील चर्चेतून शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेत नाही. चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणचे नव्हे तर उमेदवारही पाहतात. काल मी शिवसैनिकांना गेल्या काळात काय काय झाले होते ते काल सांगत होतो. त्यामुळे त्याचा अर्थ असा होत नाही की आमचे चिन्हे जाणार आहे.