28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रकोणी विकाऊ नाही... शब्द मागे घ्या; गुलाबराव पाटलांनी रवी राणांना सुनावले

कोणी विकाऊ नाही… शब्द मागे घ्या; गुलाबराव पाटलांनी रवी राणांना सुनावले

एकमत ऑनलाईन

जळगाव : माजी मंत्री, आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले आहे. रवी राणा यांनी केलेल्या ५० खोक्यांच्या आरोपावरून कडू यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणांना सुनावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे. कोणी विकावू नाह. पण तुमच्या एका वादामुळे ४० आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत, असे खडे बोल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली.

रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाहीत तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचे करिअर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघांनाही शांत बसवावे, हीच प्रार्थना असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

ठाकरे गटासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढल्याने शिंदे सरकारवर टीका होत आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सुरक्षा काढण्यावरून कुणी राजकारण करत नसतो. एखाद्या नेत्याची सुरक्षा काढल्याने कुणाला काही आनंद होत नसतो. सुरक्षे संदर्भात एक समिती काम करते, त्यानुसार तो निर्णय होतो. या समितीने घेतलेल्या आढाव्यानुसारच सुरक्षा देण्यात येते. कोणत्याही नेत्याची सुरक्षा काढण्यामध्ये सरकारला स्वारस्य नाही, असे शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

आधीच साद घातली असती, तर आज ही वेळ आली नसती
कटुता संपवावी अशी साद ‘सामना’तून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांना घातली आहे. यावरूनही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वीच अशी साद घातली असती तर आज ही वेळ आली नसती. ज्यावेळी फाटाफूट झाली, त्यावेळी आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी ही साद घातली गेली असती, तर आता बासुंदी कोण आणि अमुक कोण असे म्हणून कटुता संपवा… अशी म्हणण्याची वेळ आली नसती, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या