34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeमहाराष्ट्रपवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही

पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही

एकमत ऑनलाईन

जळगाव : पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवार यांना चिमटा काढला.

जळगाव जिल्ह्यातल्या एका विवाह सोहळ्याला गुलाबरावांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी आपल्या मोकळ्या-ढाकळ्या ढंगात फटकेबाजी केली. गुलाबरावांचा हा व्हीडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

गुलाबराव पाटील आपल्या रांगड्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कोणाची टोपी उडवतील याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय जळगावमधल्या विवाह सोहळ्यात आला. वधूचे घरचे आडनाव पवार होते. हाच धागा गुलाबराव पाटलांनी हेरला. ते म्हणाले, पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना घाबरून असतो.

ते सकाळी-सकाळी कधी शपथ घेतील आणि काय करून टाकतील याचा नेम नसतो. त्यांच्या बुद्धीपुढे कोणाचेही चालत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी सोबत ठेवतो, असा चिमटा त्यांनी काढला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. तेव्हा शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. विधानसभेतही त्यांची भाषणे आक्रमक असतात. दोन दिवसांपर्ू्वी लव्ह जिहादच्या मुद्यावरूनही त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी यांना विधानसभेत असेच घेरले होते

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या