26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, कारंजे सापडले; ओवेसींचा दावा

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, कारंजे सापडले; ओवेसींचा दावा

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेदरम्यान शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे तर मुस्लिम पक्षाने हिंदू पक्षाचा हा दावा फेटाळून लावला आहे.
यातच आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात शिवलिंग नव्हे तर कारंजे सापडले आहे. असे कारंजे प्रत्येक मशिदीत असतात, असा दावा केला आहे.
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा फेटाळत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मशीद कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, मशिदीत शिवलिंग नाही, तर कारंजे होते. एवढेच नाही, तर प्रत्येक मशिदीत कारंजे असतात, असेही ते म्हणाले.

न्यायालयाचा आदेश १९९१ मध्ये तयार झालेल्या कायद्याविरोधात
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिश्नरने शिवलिंग आढळून आल्याचा दावा न्यायालयात केलेला नाही. पण हिंदू पक्षाच्या वकिलाने न्यायालयात जाऊन, शिवलिंग आढळल्याचा दावा केला आहे. यानंतर न्यायालयाने संबंधित स्थळ सील करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश १९९१च्या संसदेत तयार झालेल्या कायद्याविरुद्ध आहे. तसेच, जर मशिदीत शिवलिंग आढळून आले, तर ही बाब कमिश्नरने न्यायालयात सांगायला हवी होती.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, खालच्या न्यायालयाचा आदेश संसदेच्या १९९१च्या कायद्याचे उल्लंघन आहे. आपण १९९१ चा आदेश मानणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी सांगून टाकावे. याशिवाय, केंद्र सरकारवर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, जर इतिहासावरच बोलायचे, तर ‘बात निकली है, तो दूर तलक जाएगी’ बेरोजगारी, महागाई, वगैरेसाठी औरंगजेबच जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या