27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही

काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मविआ सरकार बरखास्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला चांगलाच वेग आला आहे.

अशातच, शिंदेसोबत गुवाहाटी येथे असणारे बच्चू कडू यांनी काँग्रेसचे आमदारही आमच्यासोबत येणार आहेत. असा दावा केला होता. हा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खोडून काढला आहे.

बाळासाहेब थोरातांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल असून ४४ आमदार आमच्यासोबत आहेत. काँग्रेसचा कोणताही आमदार फुटलेला नाही, असे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

माध्यमांशी संवाद साधताना, विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे, अशी माहिती थोरातांनी दिली. तसेच, आमचे ४४ आमदार आमच्यासोबत मुंबईत आहेत. ३ आमदार अजून दाखल व्हायचे आहेत. ते येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. काँग्रेसमध्ये कोणतीही अडचण नाही, असे स्पष्टीकरण थोरात यांनी यावेळी दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या