Tuesday, September 26, 2023

काश्मिरातील पाकपुरस्कृत कारवायांत सहभागी नाही

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्ये अजिबात सहभागी होणार नाही. दुसºया देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करणार नाही असे तालिबानने स्पष्ट केले आहे. काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला तालिबान पाठिंबा देणार, असे दावे सोशल मीडियावरुन करण्यात येत होते. सोमवारी हे सर्व दावे तालिबानने फेटाळून लावले. तालिबानची ही भूमिका पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून दृढ मैत्रीचे संबंध आहेत. अफगाणिस्तानात दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानने नेहमीच तालिबानचा वापर केला आहे.

Read More  देशात तीन दिवसांत १५ हजार नवे रूग्ण

‘‘तालिबान काश्मीरमधल्या जिहादमध्ये सहभागी होणार, हे मीडियामध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार आणि चुकीचे आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. दुसºया देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही’’ असे सुहैल शाहीन याने सांगितले. तो अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता आहे.

Read More  बंधणे शिथील करण्याचे अधिकार राज्यांना नाहीत!

‘काश्मीर वादावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत भारताशी मैत्री होऊ शकत नाही’ असे तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहीदने म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर काश्मीरसंबंधी मोठया प्रमाणावर पोस्ट फिरत असल्याचे सोशल मीडिया मॉनिटर करणा-या टीमच्या लक्षात आले. त्या पार्श्वभूमीवर आता तालिबानच्या प्रवक्त्यानेच खंडन केले आहे. काबूल आणि दिल्लीतील राजनैतिक अधिका-यांनी ही माहिती दिली. सोशल मीडियावरील पोस्ट बनावट असून ती तालिबानची भूमिका नाही असे स्पष्ट करण्यात आले़

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या