22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रखातेवाटपावर नाराज नाही; शंभूराज देसाई

खातेवाटपावर नाराज नाही; शंभूराज देसाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपात शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला महत्त्वाची खाती मिळाली आहेत. शिंदे गटातील अनेक मंत्र्यांची दुय्यम खाती देऊन बोळवण करण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता संबंधित मंर्त्यांमध्ये नाराजी असून शिंदे गटाचे ३ कॅबिनेट मंत्री आपल्याला मिळालेल्या खात्याबाबत खूश नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना खातेवाटपावर शिंदे गटातील आमदार नाराज नाही. असे स्पष्ट सांगितले.

शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना खातेवाटपाच्या नाराजीसंदर्भात भाष्य केलं. आमच्यात मतभेद निर्माण करायचा, हा केविलवाना प्रयत्न केला जात आहे. असा आरोप देसाई यांनी यावेळी केला. खातेवाटपासंदर्भात शिंदे गटातील कुणीही नाराज नाही. खातेबदल संदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आहे. असे देसाईंनी यावेळी स्पष्ट सांगितले.

तसेच काल संतोष बांगर यानी उपहारगृह व्यवस्थापकाला कानशिलात लगावण्यासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बांगर चिडले असतील, त्यांचे हे वागणे नियमाचे पालन न केल्याने, तरीही हात उगारने योग्य नाही. बांगर यांच्याकडून अनावधानाने झालं असेल. असे देसाई यावेळी म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या