26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeक्रीडाऑस्ट्रेलियन ओपनवर नोवाक जोकोविचने कोरले नाव

ऑस्ट्रेलियन ओपनवर नोवाक जोकोविचने कोरले नाव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टेनिस खेळाचा स्टार खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने त्याच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलिया ओपनच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये त्यानं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा पराभव केला आहे. नोवाकनं स्टिफनोसला ६-३,७-४ आणि ७-६ अशा असा सरळ सेटमध्ये पराभूत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

विशेष म्हणजे यासोबत त्यानं स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेलच्या ग्रँडस्लॅमच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. नोवाकनं ऑस्ट्रेलिया ओपन जिंकल्यामुळे त्याच्याकडील ग्रँडस्लॅमची संख्या २२ झाली आहे. त्याने नदालच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. सोबतच नोवाकचं हे १० वं ऑस्ट्रेलिया ओपनचं जेतेपद असून नदालनंही १० वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. याशिवाय नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावून जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या