38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeआता पावसाळा अधिवेशनावरही कोरोनाचं सावट

आता पावसाळा अधिवेशनावरही कोरोनाचं सावट

एकमत ऑनलाईन

आधी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला फटका

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवरच आधी अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवडा गुंडाळण्यात आलं होतं. त्यानतंर आता पावसाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळाच्या कामकाजाबाबतचा निर्णय येत्या जून महिन्यातच होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन येत्या 22 जूनपासून मुंबईत सुरु होणार आहे.

22 जूनपासून घ्यायचे की लांबणीवर टाकायचं याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार
मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत निर्णय घेण्यासाठी काल सोमवारी (19 मे) कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आली होती. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चौथ्या लॉकडाऊनची मुदत 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर आगामी पावसाळी अधिवेशन नियोजित 22 जूनपासून घ्यायचे की लांबणीवर टाकायचं याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.

बैठकीसंदर्भात अधिसूचनाकाढण्यात आली नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नवनियुक्त 9 विधानपरिषद आमदारांचा सदस्यत्वाचा शपथविधी पार पडला. यानंतर संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार होती. मात्र त्या बैठकीसंदर्भात अधिसूचना विधानभवन सचिव कार्यालयातून काढण्यात आली नाही. या बैठकीबाबत तोंडी ठरलं होतं.

जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती

दरम्यान जर ही अधिसूचना रविवारी जारी केली असती, तरी देखील लॉकडाऊनमुळे कामकाज सल्लागार समितीमधील सर्व सदस्यांना बैठकीला कमी वेळात पोहोचण शक्य झालं नसतं. दरम्यान ही बैठक आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती विधानभवनातल्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनच्या कामकाजाबाबतचा निर्णय जून महिन्यात होणार आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतलं हे दुसरे अधिवेशन आहे. गेल्या मार्च महिन्यातील राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एक आठवडा आधी गुंडाळालं होतं.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या