नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रजिस्ट्रीने एक हेल्पलाईन सुरू केली आहे़ ही हेल्पलाईन ई-फायलिंगशी निगडीत प्रश्न आणि समस्यांना दूर करण्यासाठी बनवण्यात आली आहे़ लॉकडाऊनमुळे सर्वोच्च न्यायालय सध्या बंद असले तरी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. याच दरम्यान, याचिका दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर ई-फायलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Read More भारतात कोरोनाचा उद्रेक, २४ तासांत आढळले ५२४२ रुग्ण
परंतु, लॉकडाऊनमध्ये वकील आणि याचिकाकर्त्यांना याचिका दाखल करण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याच समस्या दूर करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक – १८८१ सुरू करण्यात आला आहे़ ही हेल्पलाईन सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. या हेल्पलाईनची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ अधिकाºयांकडे सोपवण्यात आली आहे.
सध्या लॉकडाऊन काळात न्यायाधीशांच्या घरातच बेन्च बसते आणि वकील आपापल्या घरांतून किंवा कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत सुनावणीत सहभागी होतात. याच मंगळवारी, पायलट प्रोजेक्ट म्हणून न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूमध्ये बसण्याची सुरूवात करू शकतात, असे सर्वोच्च न्नायालयाने सुचवले होते़ इथूनच व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रकरणांची सुनावणी होऊ शकते. दरम्यान, सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी वकिलांना गाऊन किंवा कोट परिधान करण्यास मनाई केली आहे़ संक्रमण फैलावण्याचा धोका असल्याने सरन्यायाधीशांनी हे निर्देश दिले होते. शिवाय गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने आपली उन्हाळ्याची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता १९ जूनपर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरू राहणार आहे.