28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीपोस्ट ऑफिसमध्ये आता ई-पमेंट व्यवहार

पोस्ट ऑफिसमध्ये आता ई-पमेंट व्यवहार

एकमत ऑनलाईन

परभणी : सध्या विविध शासकीय यंत्रणांनी ऑनलाईनचा स्विकार केला असून बहुतांश शासकीय कामे, शुल्क भरणे एका क्लिकवर होत आहेत. त्यात आता टपाल खातेसुध्दा मागे राहिले नाही. नागरिकांना मनी ऑर्डर, पार्सल बुकींग, स्पीड पोस्ट आणि रजिस्टर पोस्ट आदीचे शुल्क आता क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर देता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पोस्ट ऑफीसमध्ये देखील रोख रक्कम सोबत

बाळगण्याची गरज भासणार नाही. टपाल विभागाने डिजीटल मार्ग स्विकारण्यास सुरुवात केली असून त्यातच आता डिजीटल पेमेंटची भर पडली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील पोस्ट ऑफीसमध्ये देखील डिजीटल पेमेंट करता येणार असून परभणी विभागातील ३७ पोस्ट ऑफीसमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे, असे डाकघर अधिक्षक, परभणी यांनी कळविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या