26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रआता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना?

आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील शेतक-यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षाकाठी राज्यातील शेतक-यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्या अधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतक-यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील शेतक-यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्याने रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतक-यांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या आर्थिक वर्षात बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात येणार आहे. शेतक-यांना वर्षाला या योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, ते कशा पद्धतीने देणार याबाबत आणखी माहिती मिळालेली नाही.

लवकरच याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात येमार याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, सरकार लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याबाबत देखील अद्याप काही माहिती मिळालेली नाही. मात्र, मागील तीव दिवसापूर्वी कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची शक्यता
दरम्यान, आगामी काळात महानगर पालिकांच्या निवडणुका येत आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदार आपल्याकडे वळवण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या