22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रआता मसाल्याच्या किमतीही आवाक्याबाहेर

आता मसाल्याच्या किमतीही आवाक्याबाहेर

एकमत ऑनलाईन

मुंबई : महागाई आता सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग झाली आहे. आता जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली नाही तर जीवनात आळणीपणा आला की काय, असे वाटते नाही का? प्रत्येक वस्तू महाग झाली आहे. गेल्या दोन वर्षांत महागाईने कळसच काय आकाशाला ठेंगणे केले आहे.

इंधन दरवाढ, वीजदरवाढ, गॅस, किराणा, किरकोळ सामान, दूध, मीठ सगळ्याच क्षेत्रात जोरदार किमती वाढल्या आहेत. खाद्यतेल अजूनही महागच आहे. तर आता ज्यामुळे भाज्यांना चव येते, सुहास दरवळतो, तो मसालाही महाग झाला आहे. मसाल्याच्या किमती वाढल्याने त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना आता बसणार आहे. ऐन सणासुदीत मसाल्याच्या किमती भडकल्या आहेत. त्यामुळे फुरका मारून पिली जाणारी आमटी असो वा खास भाज्या यांची चव जास्त काळ जिभेवर काही रुळणार नाही.

किमतीत ३० टक्क्यांची वाढ
गेल्या काही वर्षांत मसाल्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर दरवाढीचा स्पीड तुमच्या लक्षात येईल. या वेगाने तर कोणते उत्पन्नसुद्धा वाढत नाही. गेल्या दोन वर्षांत मसाल्याच्या पदार्थांवर नजर टाकली, त्यांच्या किमतीवर नजर टाकली तर किमतीतील वाढ लक्षात येईल. गेल्या दोन वर्षांत मसाल्याच्या किमतीत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. एवढेच नाहीतर खाद्यतेलाच्या किमती अगोदरच खूप वाढल्यानंतर आता त्यात थोडीफार घट झाली आहे. तर डाळींचे भावही वाढले आहेत. तांदळाच्या किमतीत ३२ टक्के वाढ झाली आहे.

नागरिकांचा खिसा खाली
पूर्वी भरल्या खिशांनी जाणारा सर्वसामान्य नागरिक अर्धा खिसा आणि पूर्ण भरलेल्या पिशवीने परत यायचा. आता भरल्या खिशांनी बाजारात जाणारा व्यक्ती, पूर्ण खिसा खाली करून अर्ध्या पिशवीसह परत येतो, ही वस्तुस्थिती आहे. सर्वच क्षेत्रांत महागाईने अधिक्रमण केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या