25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयआता जेट एअरवेज पुन्हा उड्डाण घेणार

आता जेट एअरवेज पुन्हा उड्डाण घेणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे मागील ३ वर्षे बंद असणारी जेट एअरवेज कंपनीची विमाने आता पुन्हा उड्डाण घेणार आहेत. हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने परवानगी दिल्याने आता ही विमानसेवा पुन्हा सुरु होत आहे.

वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी मागील बराच काळापासून प्रयत्न सुरू होते. कंपनीचे नवे मालक मुरारीलाल जलान यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या घेऊन आता कंपनी लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. त्याआधी महिनाभरापासून सराव उड्डाणे सुरू होती. आता कंपनीला एअर ऑपरेटर सर्टीफिकेट देण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या